ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) : रस्त्यांवर अर्जेंटिनाचे झेंडे, निळ्या जर्सी घातलेल्या लोकांची गर्दी आणि आकाशात घुमणारा 'मेस्सी मेस्सी'चा आवाज! फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 असा विजय मिळवल्यानंतर हे दृश्य देशातील जवळपास प्रत्येक शहरात पाहायला मिळाले. फुटबॉलचे वेड असलेला हा देश अक्षरश: कधीही न संपणाऱ्या उत्सवात बुडाला. राजधानी ब्युनोस आयर्समध्ये सामना संपताच लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली. संघाची जर्सी घातलेल्या लोकांच्या हातात देशाचा ध्वज आणि ओठांवर राष्ट्रगीत होते. (Argentina in FIFA World Cup final). (argentina celebrate as they reach world cup final).
FIFA World Cup 2022 : विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचताच संपूर्ण अर्जेंटिना बुडाली जल्लोषात!
सामना सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता होती. कडक उन्हात लोकं कॅफे, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनसमोर बसून एकटक सामना पाहत होते. या सर्वांचे डोळे सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या कामगिरीकडे लागले होते. मेस्सीने 33व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यावर पालेर्मो येथील पारंपारिक कॅफेमध्ये शांत बसलेल्या जमावाने एकच जल्लोष केला. (Argentina in FIFA World Cup final). (argentina celebrate as they reach world cup final).
चाहत्यांच्या प्रतिक्रिया : सामना सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता होती. कडक उन्हात लोकं कॅफे, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनसमोर बसून एकटक सामना पाहत होते. या सर्वांचे डोळे सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या कामगिरीकडे लागले होते. मेस्सीने 33व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यावर पालेर्मो येथील पारंपारिक कॅफेमध्ये शांत बसलेल्या जमावाने एकच जल्लोष केला. एका जाहिरात कंपनीत काम करणारा 31 वर्षीय एमिलियानो अॅडम म्हणाला, "मी आनंदाने वेडा झालो आहे. मी सामन्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आनंद घेतला". अभिनेत्री लैला डेस्मारी म्हणाली, "आम्ही सर्वजण रोमांचित झालो आहोत. आम्हाला खूप वर्षांनी अशाप्रकारचा आनंद मिळाला. पुढचे काही दिवस किती चांगले असतील हे सांगता येत नाही". वास्तुविशारद मारियानो बेलस्ट्रास म्हणाले, "संघाच्या कामगिरीत प्रत्येक सामन्यानंकर झालेली सुधारणा कौतुकास्पद आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवानंतर संघ एकवटल्याचे दिसले".
देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक : संघाच्या या कामगिरीमुळे आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या या देशातील लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटले आहे. अर्जेंटिनामधील चलनवाढीचा दर दरवर्षी सुमारे 100 टक्के आहे आणि देशातील दहापैकी चार लोक गरिबीत जीवन जगत आहेत. पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून अनपेक्षितरित्या पराभव झाल्यानंतर संघाने सलग विजयांची नोंद करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना फ्रान्स किंवा मोरोक्कोशी होणार आहे.