नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्वारोहणात दोन पदके जिंकणारा भारतीय फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. २७ वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून भारताची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणली.
आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून २० फेब्रुवारी २०२० ला मिर्झाच्या पात्रतेची घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी भारताकडून इम्तियाज अनीस (सिडनी, २००० ) आणि आय. जे. लांबा (अटलांटा, १९९६) यांनी ऑलिम्पिकमध्ये अश्वारोहणात प्रतिनिधित्व केले आहे.
मिर्झाने अश्वरोहणासाठीच्या सहा पात्रता स्पर्धेत एकूण ६४ गुणांची कमाई केली. दरम्यान, मिर्झाला ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.