ब्राझील -भारताची युवा नेमबाजपटू ईलावेनिल वालारिवनने ब्राझील येथे सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम रचला. तिने या स्पर्धेतील वरिष्ठ गटामध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक पहिलेच सुवर्णपदक पटकावले.
ISSF वर्ल्ड कप : २० वर्षीय भारताची नेमबाजपटू सुवर्णपदक मिळवूनही अपयशी - ईलावेनिल वालारिवन
ईलावेनिलने ही सुवर्णकामगिरी केली असली तरी, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली. २० वर्षीय ईलावेनिलने २५१.७ गुण मिळवले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोशने २५०.६ आणि चीनच्या यिंग लिन यांनी २४९.५ गुण कमावत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

दुसरीकडे, १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक तर, सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अभिषेकने २४४.२ गुण कमावले. तर, सौरभला २२१.९ गुण मिळाले. अभिषेक आणि सौरभ यांनी पात्रता इवेंटमध्येच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. या फेरीत सौरभ ५८४ गुणांसह चौथ्या तर, अभिषेक ५८२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला होता.