सुहल -इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) च्या ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या इलावेनिल वालारिवानने सुवर्णपदक पटकावले. आपलीच साथीदार मेहुली घोष हिला 1.4 अशा गुणांनी हरवले आणि एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.
ISSF JUNIOR WC : भारताची सुवर्णकन्या इलावेनिलचा विश्वविक्रम! - junior shooting
इलावेनिल आणि मेहुलीने श्रेया अगरवालसोबत 625.4 गुणांसह सांघिक सुवर्णपदकही पटकावले आहे.
इलावेनिलने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 251.6 गुण मिळवले. तसेच मेहुलीने दुसरे तर फ्रांसच्या मारियाने म्युलरने तिसरे स्थान मिळावत कांस्य पदक राखले. इलावेनिल आणि मेहुलीने श्रेया अगरवालसोबत 625.4 गुणांसह सांघिक सुवर्णपदकही पटकावले आहे. या तिघांनी मिळून 1883.3 गुण मिळवत ज्युनिअर विश्वकरंडक स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला.
या स्पर्धेत पदकांच्या आकडेवारीत भारताने प्रथम स्थान काबीज केले आहे. भारताने सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावले आहेत. रुस आणि नॉर्वे या देशांना दोन सुवर्ण तर, चीन, ऑस्ट्रिया, थाईलँड आणि जर्मनीला प्रत्येकी एक-एक सुवर्णपदक मिळाले आहे.