भुवनेश्वर - 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'चा पहिला हंगाम २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने सुवर्णपदक पटकावले. द्युतीने १०० मीटर स्पर्धेत ही कामगिरी केली.
हेही वाचा -तीन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या जलतरणपटूवर ८ वर्षांची बंदी
तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या द्युतीने ११.४९ सेकंदाची वेळ नोंदवली. यापूर्वी, तिने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ११.२२ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवली होती. ऑलिम्पिक पात्रता गाठण्यासाठी ११.१५ सेंकदाची वेळ ठेवण्यात आली आहे.
केआरआयटीच्या यजमान विद्यापीठाची विद्यार्थीनी - धावपटू द्युतीने पहिल्या दिवशी झालेल्या उपांत्य फेरीत ११.६१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये रग्बीसह १७ खेळ समाविष्ट आहेत. या खेळांमध्ये प्रथमच तलवारबाजीचा समावेश करण्यात आला आहे.