कॅक्सियास दो सुल (ब्राझील): भारताची गोल्फपटू दीक्षा डागर ( Indian Golfer Diksha Dagar ) हिने डेफलिंपिक गोल्फ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या एशलिन ग्रेसचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. दीक्षाचे हे कर्णबधिरांसाठीचे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आहे. याआधी 2017 मध्ये तिने रौप्य पदक जिंकले होते. या खेळांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.
युरोपियन टूरमध्ये खेळलेल्या 21 वर्षीय दीक्षाने महिला गोल्फ स्पर्धेच्या मॅच प्ले प्रकारात अंतिम फेरीत पाच आणि चारने विजय नोंदवला. याचा अर्थ दीक्षा जेव्हा पाच होलमध्ये (छिद्र) जिंकली तेव्हा चार होल (छिद्रे) शिल्लक होती. 2017 मध्ये जेव्हा प्रथमच बधिर ऑलिंपिकमध्ये गोल्फचा समावेश करण्यात आला, तेव्हा दीक्षाने सहजपणे अंतिम फेरी गाठली. मात्र अमेरिकेच्या योस्ट कीलिनने तिला हरवून सुवर्णपदक पटकावले आणि भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.