मुंबई - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात आज (रविवार) पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीसमोर हरियाणा स्टीलर्सचे आव्हान होते. दबंग दिल्लीने सामना एकतर्फी करताना हरियाणाचा ४१-२१ अशा २० गुणांच्या फरकाने पराभव केला. दिल्लीकडून चंद्रन रंजितने चढाईत ११ गुणांची करताना विजयात मोलाची भूमिका बजावली.
PRO KABADDI 2019 : हरियाणासमोर दिल्लीच ठरली 'दबंग' - चंद्रन रंजित
पहिले सत्र संपण्यापूर्वी दिल्लीने १५-१० अशी ५ गुणांची आघाडी घेतली होती. सामनाच्या अखेरपर्यंत दिल्लीने आघाडी कमी न होऊ देता सामना ४१-२१ असा आरामात जिंकला. विजयासह दिल्लीचा संघ ३ सामन्यांत ३ विजयांसह पहिल्यास्थानी पोहचला आहे.
पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासूनच दिल्लीने सामन्यात आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. चंद्रन रंजितने पहिल्या चढाईत हरियाणाच्या २ खेळाडूंना बाद करत संघाला आघाडी मिळवून दिली. पहिले सत्र संपण्यापूर्वी दिल्लीने १५-१० अशी ५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात दिल्लीने हरियाणाच्या खेळाडूंचा निभाव लागू दिला नाही. २३ व्या मिनिटाला दिल्लीने हरियाणावर पहिला लोन चढवत १० गुणांची आघाडी घेतली. यानंतर, दिल्लीने ३० व्या मिनिटाला दुसरा लोन चढवत आघाडी १७ गुणांची करत विजय निश्चित केला. सामनाच्या अखेरपर्यंत दिल्लीने आघाडी कमी न होऊ देता सामना ४१-२१ असा आरामात जिंकला. विजयासह दिल्लीचा संघ ३ सामन्यांत ३ विजयांसह पहिल्यास्थानी पोहचला आहे.
दिल्लीकडून चढाईत चंद्रन रंजित ११ गुण आणि नविन कुमारने १० गुणांची कमाई केली. तर, साईद गफारीने ४ गुण घेतले. बचावात जोगिंदर नरवालने ३ गुण आणि विशाल मानेने २ गुणांची कमाई करत चांगली कामगिरी केली. हरियाणाकडून नविनने चढाईत ९ गुणांची करत चांगली कामगिरी केली. परंतु, इतर खेळाडूंनी निराशाजनक खेळ केल्याने संघाला पराभवामुळे सामोरे जावे लागले.