पणजी - गोवा बुद्धिबळ संघटनेने 18 ते 25 जूनदरम्यान आंतरराष्ट्रीय खूली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी (दि.18) दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मंगळवारपासून पणजीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ - chess competition
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मंगळवारपासून पणजीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
उद्घाटन सोहळ्यासाठी गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून देश-विदेशातील नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. यामधील 'ब' गटाचे बक्षीस वितरण दि. 21 जूनला संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान करण्यात येणार आहे. तर 'क' गटाचे बक्षीस वितरण दि. 25 जूनला संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान होणार आहे.