पॅरिस: कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टीना म्लादेनोविक या फ्रेंच जोडीने रविवारी कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या अमेरिकन जोडीचा पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथे कॅरोलिन आणि क्रिस्टिना यांची ही दुसरी महिला दुहेरी स्पर्धा आहे. या जोडीने 2016 मध्येही येथे विजेतेपद पटकावले होते.
French Open 2022 : कॅरोलिन-क्रिस्टीना यांनी पटकावले फ्रेंच ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद - फ्रेंच ओपन २०२२
कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टीना म्लादेनोविक या फ्रेंच जोडीने फ्रेंच ओपन 2022 च्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. फ्रान्सच्या जोडीने अंतिम फेरीत अमेरिकेच्या कोको गफ आणि जेसिका पेगुला यांचा 2-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.

कॅरोलिन आणि क्रिस्टिना जोडीने अंतिम फेरीत एकेरी उपविजेत्या गॉफ आणि पेगुला यांच्याकडून 2-6, 6-3, 6-2 असा विजय मिळवून पुनरागमन केले. शनिवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये 18 वर्षीय तरुणीला इंगा स्वियाटेककडून पराभव पत्करावा लागला होता. गफ आणि पेगुला पहिल्यांदाच मोठ्या दुहेरी स्पर्धेत एकत्र खेळत होते. त्याच वेळी, क्रिस्टीनाची ही सहावी ग्रँड स्लॅम महिला दुहेरी ट्रॉफी आहे, ज्यापैकी तिने तिमा बाबोससह चार जिंकले आहेत.
हेही वाचा : French Open 2022 : 'नदालने मन जिंकलं'; सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री असं का म्हणाले?