हांगझोऊ (चीन) Asian Games 2023 :चीनच्या हांगझोऊमध्ये सुरू असलेल्याआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरीत सातत्य ठेवलं आहे. शुक्रवारी सकाळी महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या पलकनं सुवर्णपदक पटकावलं. तर, ईशा सिंगनं रौप्यपदकाची कमाई केली केली. यासह आशियाई स्पर्धेत आठ सुवर्णपदकांसह भारतानं जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या ३० झाली आहे.
भारतीय महिलांनी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकलं : आशियाई स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या १७ वर्षांय पलकनं सुवर्णपदक जिंकलं. यासह १८ वर्षीय ईशा सिंगनं रौप्यपदकाची कमाई केली. पलकनं अंतिम फेरीत सर्वाधिक २४२.१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारताचीच आणखी एक नेमबाज ईशा सिंगनं दुसरं स्थान पटकावलं. तर पाकिस्तानी खेळाडूनं कांस्यपदक जिंकलं.
१८ वर्षीय ईशा सिंगची दमदार कामगिरी : यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हैदराबादच्या १८ वर्षीय ईशा सिंगनं दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत एकूण चार पदकं जिंकली आहेत. तिनं या आधी १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. तसेच तिनं २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत देखील सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलंय.
भारतानं आत्तापर्यंत ८ सुवर्णपदकांसह ३० पदकं जिंकली : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. भारतानं या दिवसाची उत्तम सुरुवात केलीय. भारताच्या नेमबाजांनी आज दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्यपदकं पटकावली. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारतीय जोडीला पराभव पत्कारावा लागला. या स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंत ८ सुवर्णपदकांसह एकूण ३० पदकं जिंकली आहेत.
हेही वाचा :
- ६७ Year Old Runner : या धावपटूनं वयाच्या ६७ व्या वर्षी जिंकली आहेत डझनभर पदकं!
- Asian Games 2023 : सिफ्ट समरानं सुवर्णपदकं जिंकलं, आशी चौकसेला रौप्यपदक
- Indian 10m air rifle team gold: भारताच्या रायफल संघानं देशाला मिळवून दिलं पहिल सुवर्णपदक, संघात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटील समावेश