महाराष्ट्र

maharashtra

मीटन कप : नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि दिव्यांश सिंगला सुवर्णपदक

By

Published : Jan 21, 2020, 5:04 PM IST

अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.४ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. तर, पुरुषांमध्ये दिव्यांशने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

Apurvi Chandela and Divyansh Singh won gold medal in Maton Cup
मीटन कप : नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि दिव्यांशसिंगला सुवर्णपदक

इन्सब्रुक - येथील मीटन चषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनुभवी भारतीय नेमबाजपटू अपूर्वी चंदेला आणि दिव्यांशसिंग पवार यांनी सुवर्णपदक जिंकले. अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.४ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अंजुम मुदगिलला २२९ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा -Australian Open : दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल दुसऱ्या फेरीत

पुरुषांमध्ये दिव्यांशने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दीपक कुमारला २२८ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या चार नेमबाजपटूंनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा जिंकला आहे. टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details