महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नांदेडच्या लता उमरेकरला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी मदत करण्याचे आवाहन - नांदेडची मुलगी लता उमरेकर

दिव्यांगपणा आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही नांदेडच्या लता उमरेकर या तरुणीने बॅडमिंटन स्पर्धेत आजवर पाच पदके प्राप्त केली आहेत. याच लताला आता स्पेन आणि दुबई इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी येजा करायला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाण्याकरिता मदत करावी असे आवाहन लताने केल आहे.

लता उमरेकरला मदतीचे आवाहन
लता उमरेकरला मदतीचे आवाहन

By

Published : Feb 5, 2022, 3:59 PM IST

नांदेड - दिव्यांगपणा आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही नांदेडच्या लता उमरेकर या तरुणीने बॅडमिंटन स्पर्धेत आजवर पाच पदके प्राप्त केली आहेत. याच लताला आता स्पेन आणि दुबई इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी येजा करायला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाण्याकरिता मदत करावी असे आवाहन लताने केल आहे.

लता उमरेकरला मदतीचे आवाहन

उंचीने कमी असलेल्या लताची कीर्ती मात्र देशभर

नांदेड शहरातील दत्तनगर भागांत छोट्याश्या घरात आईवडिलांसह लता ही दिव्यांग राहते. स्वतः उंचीने कमी असलेल्या लताची कीर्ती मात्र देशभर पसरलेली आहे. लता ही बॅडमिंटन स्पर्धेची राष्ट्रीय खेळाडू आहे, तिने आजवर देशभर झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य, सुवर्ण असे विविध पाच पदके जिंकली आहेत. लताचे आईवडील आणि भाऊ हे मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्पेन आणि दुबईला निमंत्रित

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही लताने बॅडमिंटन खेळासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद अशीच आहे. याच लताला आता आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी स्पेन आणि दुबईला निमंत्रित करण्यात आल आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च लताला परवडणारा नाही, त्यातून लता हताश झाली आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोन्ही देशात जाण्यासाठी लताला जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. मात्र तिच्या कुटुंबाची हा खर्च करण्याची ऐपत नाही. त्यामुळे लताच्या कोच, आईसह लताने मदतीचे आवाहन केल आहे. समाजातील दानशूर मंडळींनी प्रवासखर्च भागवला तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे नाव उज्जवल करण्याचा विश्वास लताने व्यक्त केला आहे.
हेही वाचा -रोहित शर्मा समोर फिट राहण्याचे आव्हान - माजी खेळाडू अजित आगरकर

ABOUT THE AUTHOR

...view details