बर्मिंघम -कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय क्रिडापट्टूंची सोनेरी वाटचाल ( Achinta Sheuli won gold medal ) सुरूच आहे. वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या अचिंता शेऊली याने 73 किलो गटात स्वर्ण पदक ( Achinta Sheuli in common wealth games 2022 ) पटकावले आहे. हा भारताचा तीसरा सुवर्ण पदक आहे. 20 वर्षीय अंचिता याणे 313 किलो वजन उचलून ही चमकदार कामगिरी केली. या अगोदर जेरेमी लालरिननुंगा, आणि मिराबाई चाणून हिने वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे.
हेही वाचा -Jeremy Lalrinnunga Gold Medal: वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पटकावले पाचवे पदक; जेरेमी लालरिनुंगाने जिंकले सुवर्णपदक
शेऊलीने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलत एक नवा विक्रम केला. त्याने क्लिन अँड जर्कमध्ये 170 किलो वजनासह एकूण 313 किलोचे भार उचलून विक्रम केला. गेल्या वर्षी ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या शेऊलीने तिसऱ्या प्रयत्नात दोन्ही सर्वोत्तम लिफ्ट्स केल्या. या स्पर्धेत मलेशियाचे ई हिदायत मोहम्मद यांना रौप्य पदक तर कॅनडाचे शाद डारसिग्नी यांनी कांस्य पदक जिंकले आहे.
जेरेमीने मिळवले स्वर्ण पदक - भारताला राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( Commonwealth Games 2022 ) मध्ये पाचवे पदक मिळाले आहे. जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 67 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमी लालरिनुंगाने स्नॅचमध्ये विक्रमी 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. म्हणजेच, एक गेम्स रेकॉर्ड करत त्याने एकूण 300 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक ( Weightlifter Jeremy Lalrinunga won gold medal ) जिंकले.
मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो गटात सुवर्णपदक जिंकले - वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले ( Mirabai Chanu wins Gold medal ) आहे. या प्रकारात तिने रेकॉर्ड केला आहे. ( Commonwealth Games 2022 ) मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. चानूने एकूण 201 किलो वजन उचलून महिलांच्या 49 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले.
हेही वाचा -CWG 2022 : भारताने उघडले विजयाचे खाते; स्मृती मंधानाच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानवर मात