नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यात सुरू असलेले ट्विटर युद्ध आता वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलचा फलंदाजीचा दर्जा ढासळत असल्याने त्याच्यावर व्यंकटेश प्रसादने ट्विटरवरून टीका केली होती. आता त्याच्या अलीकडच्या ढासळत्या कसोटी फॉर्मवरून आकाश चोप्रा आणि माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांच्यात वाद सुरू झाला आहे. हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचला आहे.
दोन माजी खेळाडूंचे म्हणणे :आकाश चोप्राने केएल राहुलचा बचाव करताना म्हटले की, राहुल हा महान खेळाडू असून, त्याला संघात संधी मिळायला हवी. त्याचवेळी, वेंकटेश प्रसाद बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या सुरुवातीपासूनच केएल राहुलच्या संघातील समावेशावर प्रश्न उपस्थित करीत आहेत आणि त्याला वारंवार खेळण्याची संधी दिली जाते, यावर टीक करीत आहेत.
चोप्राने राहुलच्या समर्थनार्थ यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ :व्यंकटेशने आपल्या एका ट्विटद्वारे राहुलला इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. प्रसादने मयंक अग्रवाल, शिखर धवन, शुभमन गिल यांच्या कसोटी आकडेवारीची राहुलच्या आकड्यांशी तुलना केली आणि सांगितले की त्यांची कामगिरी तितकीशी वाईट नव्हती, पण तरीही त्यांना संघात संधी मिळाली नाही. केएल राहुलवरून आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यात सुरू झालेल्या भांडणाने आता वैयक्तिक स्वरूप धारण केले आहे. मंगळवारी आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हिडिओद्वारे केएल राहुलच्या समर्थनार्थ अनेक आकडे शेअर केले आणि व्यंकटेश प्रसाद यांना कोणताही अजेंडा न चालवण्यास सांगितले.