चेन्नई ( तामिळनाडू ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी गुरुवारी संध्याकाळी चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले. 28-29 जुलै रोजी पंतप्रधान गुजरात आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. मिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. ( Chess Olympiad Opening Ceremony )
भव्य दिव्य असे उद्घाटन :चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियमवर रविवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे भव्य उद्घाटन झाले. PM मोदींनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचा शुभारंभ केला. मशालने 40 दिवसांच्या कालावधीत देशातील 75 प्रतिष्ठित ठिकाणांचा प्रवास म्हणजे सुमारे 20,000 किमी प्रवास केला. FIDE स्वित्झर्लंडमधील मुख्यालयात जाण्यापूर्वी ते महाबलीपुरम येथे संपणार आहे.
१८७ देशांचा सहभाग :44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 1927 पासून आयोजित, ही प्रतिष्ठित स्पर्धा प्रथमच भारतात आणि 30 वर्षांनंतर आशियामध्ये आयोजित केली जात आहे. 187 देशांचा सहभाग असल्याने कोणत्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील हा सर्वात मोठा सहभाग असेल. भारतही या स्पर्धेत आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ उतरवत आहे. यात 6 संघातील 30 खेळाडूंचा समावेश आहे.