मुंबई - महाराष्ट्रात सध्या उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. समाजातील सर्वस्तरातून कोरोना विरुद्ध लढाईत प्रत्येक जण आपापले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण पिढीही यामध्ये मागे नाही, रक्तदान शिबिर असो वा अन्य उपक्रमांच्या माध्यमातून तरुण पुढे सरसावून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. यात मुंबईतील १९ वर्षीय गोल्फपटू कृशिव के. एल. तेकचंदाणी यानेही कौतुकास्पद काम केलं आहे.
कोरोना काळात मदतीचा हात म्हणून नुकतेच कृशिवने स्पर्धांमधील जिंकलेली आपली कमाईची रक्कम चेंबूरमधील बॉम्बे प्रेसडेंसी गोल्फ क्लबला दान केली आहे. गोल्फ फील्डवरील कर्मचाऱ्यांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी त्याने ही आर्थिक मदत देऊ केली आहे. कृशिवने यापूर्वीही अशीच सामाजिक बांधिलकी जपत मदत कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. वयाच्या १८ वर्षांपासून तो आपल्या वाढदिवशी रक्तदान मोहिमेत सहभाग घेऊन गरजूंना मदत करतो.