नवी दिल्ली - सरकारच्या योजनांमध्ये प्राधान्य असणार्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे डोपिंग प्रकरण समोर आले आहे. १० ते २२ जानेवारी दरम्यान गुवाहाटी येथे आयोजित 'खेलो इंडिया युथ गेम्स' स्पर्धेतील तब्बल १५ खेळाडू डोपिंगप्रकरणात आढळले आहेत. दिल्ली येथे ११ आणि नंतर पुण्यात झालेल्या स्पर्धेतील ९ खेळाडू डोपिंगमध्ये अडकले होते. यातील बहुतेक खेळाडू सुवर्णपदक विजेते आणि अल्पवयीन आहेत. स्टेरॉइडसाठी डोपिंगमध्ये पकडलेल्या खेळाडूंवर नाडाने तात्पुरती बंदी घातली आहे.
चार वेटलिफ्टर्स, चार कुस्तीपटू, कबड्डीमधील तीन आणि अॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलिबॉल आणि बॉक्सिंगमधील खेळाडूंचा यात समावेश आहे. काही खेळाडूंना ही चाचणी करण्यास सांगितले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत.