टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा आज रविवारी समारोप सोहळा होणार आहे. या सोहळ्यात भारताचे 10 अधिकारी सहभागी होणार आहे. उद्धाटन सोहळ्यात खेळाडू पारंपरिक पोशाखात दिसून आले होते. पण समारोह सोहळ्यात खेळाडू ट्रॅक सूटमध्ये पाहायला मिळतील.
भारतीय वेळेनुसार, समारोह सोहळ्याला सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहे. या सोहळ्यात भारताचे हॉकी आणि कुस्तीमधील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी कास्य पदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया या समारोह सोहळ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघ प्रोटोकॉलनुसार, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुलसह भविष्यातील क्रीडा स्पर्धेत देशाचा ध्वजवाहक असेल.
दरम्यान, भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि महिला बॉक्सर एमसी मेरी कोम उद्धाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.
टोकियोत भारताचा डंका
भारताने 127 खेळाडूंचा संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठवला होता. यात भारताला 7 पदकं जिंकता आली. ही संख्या लोकसंख्येची घनता पाहता कमी आहे. परंतु भारताची ही ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली.
भारताचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदक
मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले. त्यानंतर महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी यात कास्य पदकाच्या रुपाने भर घातली. यानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ 41 वर्षांनंतर कास्य पदकाचा विजेता ठरला. कुस्तीपटू रवी कुमार दाहियाने रौप्य पदक जिंकत आपलं योगदान दिलं. शनिवारी बजरंग पुनियाने कास्य तर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक जिंकला.
हेही वाचा -सुवर्ण पदकानंतर नीरज चोप्राचे पुढील लक्ष्य काय? जाणून घ्या काय म्हणाला गोल्डन बॉय
हेही वाचा -'राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले', नीरज चोप्रावरील एका ट्विटने पेटला नवा वाद