नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक वर्षात विजयासह प्रारंभ केला. यंदाची पहिली स्पर्धा खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारताने यजमानांना ४-० ने पराभूत केले.
महिला हॉकी : न्यूझीलंडवर भारताचा ४-० ने विजय
भारताकडून कर्णधार राणी रामपालने दोन गोल केले. त्याचवेळी शर्मिला आणि नमिता टोप्पो यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. तिसर्या क्वार्टरमध्ये राणीने भारतासाठी पहिला गोल केला. यानंतर त्याच क्वार्टरमध्ये शर्मिलाने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या क्वार्टरमध्ये राणीने आणखी एक गोल केला. त्यानंतर नमिताने अखेरचा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

'सामन्याच्या सुरूवातीस आम्ही इतके चांगले नव्हतो, परंतु त्यानंतर शानदार खेळ करत अनेक खेळाडूंनी संधी निर्माण केल्या. शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये न्यूझीलंडच्या संघाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. असे असूनही, आम्ही सकारात्मक होतो. आम्ही आमच्या खेळात सातत्याने सुधारणा करू', असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सॉर्डड मरीन सामन्यानंतर म्हणाले आहेत.
यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर यजमानांसह ४ सामने तर, ग्रेट ब्रिटनशी एक सामना खेळणार आहे.