महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार

राणी व्यतिरिक्त कराटे स्टार स्टॅनिस्लाव होरुना (युक्रेन), कॅनेडियन पॉवरलिफ्टर चॅम्पियन रहेया स्टाईन आणि स्लोव्हेनियाची स्पोर्ट क्लाइंबिंग स्टार जंजा गार्नब्रॅट यांनाही चांगली मते मिळाली होती. मात्र, राणीने या सर्वांना मागे टाकले.

Rani Rampal won the World Games Athlete of the Year award
राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार

By

Published : Jan 31, 2020, 1:22 PM IST

लुसाने -भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने गुरुवारी 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर 2019' चा पुरस्कार जिंकला आहे. उत्कृष्ट कामगिरी, सामाजिक भान आणि चांगल्या वर्तनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. जनतेने या पुरस्कारासाठी मतदान केले.

हेही वाचा -कॅनडाच्या महिला खेळाडूनं मोडला फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम!

२५ पुरुष आणि महिलांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यामधून अंतिम १० जणांसाठी जनमत घेण्यात आले. 'ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. हा पुरस्कार माझ्या संघाला आणि माझ्या देशाला मी अर्पण करते. जेव्हा तुमचा देश तुमच्या मेहनतीला प्राधान्य देतो आणि आंततराष्ट्रीय क्रीडा जगत तुम्हाला सन्मान देते तेव्हा चांगले वाटते. ज्या लोकांनी मला मत दिले त्यांचे आभार. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो असल्याने २०१९ वर्ष संघासाठी उत्कृष्ट ठरले', असे राणीने हा पुरस्कार जिंकल्यावर म्हटले आहे.

राणी व्यतिरिक्त कराटे स्टार स्टॅनिस्लाव होरुना (युक्रेन), कॅनेडियन पॉवरलिफ्टर चॅम्पियन रहेया स्टाईन आणि स्लोव्हेनियाची स्पोर्ट क्लाइंबिंग स्टार जंजा गार्नब्रॅट यांनाही चांगली मते मिळाली होती. मात्र, राणीने या सर्वांना मागे टाकले.

वयाच्या १५ व्या वर्षापासून भारताकडून खेळत असलेल्या राणीने आतापर्यंत एकूण २४० सामने खेळले आहेत. भारतीय संघाने राणीच्या नेतृत्वात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details