नवी दिल्ली -रानी रामपालच्या नेतृत्वात भारतीय महिला हॉकी टीम रविवारी अर्जेंटीनाच्या दौऱ्यावर रवाना झाली. भारतीय हॉकी टीम कोविड-19 महामारीमुळे जवळपास एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
कोरोना महामारीमुळे कोणतीही आतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय संघाला बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात सरावावरच समाधान मानावे लागले.
भारतीय टीम जगातील दुसऱ्या नामांकित अर्जेंटीना संघाबरोबर चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26, 28, 30 आणि 31 जानेवारी रोजी हे सामने खेळले जातील. त्यापूर्वी भारतीय टीम अर्जेंटीना जूनियर टीम आणि बी टीमविरुद्ध सराव सामने खेळेल.