महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला हॉकी : भारताने मलेशियाला 3-0 ने केले पराभूत - series opener

बारताकडून वंदना कटारियाने २ गोल केलेत

भारताने मलेशियाला 3-0 ने केले पराभूत

By

Published : Apr 5, 2019, 9:35 AM IST

क्वालालंपूर -भारतीय महिला हॉकी संघ सध्या मलेशिया दौऱ्यावर असून ५ हॉकी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने मलेशियाला ३-० ने मात देत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.


वंदना कटारियाने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत २ गोल केले. वंदनासोबत लालरेमसियामीने १ गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. वंदना 17 व्या आणि ६० व्या तर लालरेमसियामीने ३८ व्या मिनिटाला गोल केलेत.


आठ दिवसाच्या या मलेशियाला दौऱ्यासाठी गोलरक्षक सविता पुनियाकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर दीप ग्रेसला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details