महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताने जर्मनीचा ६-१ ने उडवला धुव्वा - indian hockey team latest news

भारतीय पुरूष हॉकी संघाने जर्मनी दौऱ्याची सुरूवात विजयाने केली. जवळपास १२ महिन्यांनंतर पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवला.

indian hockey team defeated germany 6-1 in their home
भारताकडून जर्मनीचा धुव्वा

By

Published : Mar 1, 2021, 10:04 AM IST

डसेलडॉर्फ - भारतीय पुरूष हॉकी संघाने जर्मनी दौऱ्याची सुरूवात विजयाने केली. जवळपास १२ महिन्यांनंतर पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवला.

भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले. १३व्या मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर निळकंठ शर्माने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तेव्हा पुढच्याच मिनिटाला कॉन्टन्टिन स्टेइबने जर्मनीला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

दुसऱ्या सत्रात विवेकने लागोपाठ दोन गोल करत भारताला ३-१ असे आघाडीवर आणले. सागरने २७व्या आणि २८व्या मिनिटाला गोल केलं. तिसऱ्या सत्रात जर्मनीने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण पी.आर. श्रीजेशच्या भक्कम बचावासमोर त्यांना एकही गोल करता आला नाही.

ललित कुमार उपाध्यायने ४१व्या मिनिटाला तर आकाशदीप सिंगने ४२व्या मिनिटाला आणि हरमनप्रीत सिंगने ४७व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

भारतीय महिला हॉकी संघ जर्मनीकडून पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाला जर्मनी दौऱ्यात सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा दुसऱ्या सामन्यात१-0 असा पराभव झाला. या विजयासह जर्मनीने चार सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तर भारताने पहिला सामना ०-५ अशा फरकाने गमावला होता.

हेही वाचा -महिला हॉकी : जर्मनी दौऱ्यात भारताचा सलग दुसरा पराभव

हेही वाचा -Exclusive: माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्याशी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम विषयावरुन खास बातचित

ABOUT THE AUTHOR

...view details