Sultan Azlan Shah Cup: भारत अंतिम फेरीत, पोलंडचा १०-० ने उडवला धुव्वा - 10-0
या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात भारताने विजयश्री मिळवली आहे
इपोह (मलेशिया) -सुल्तान अझलन शाह चषकात आज भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडविरुद्ध आपला पाचवा सामना खेळला. या सामन्यात भारताने पोलंडचा १०-० ने धुव्वा उडवत मोठा विजय साजरा केला. भारतीय संघाने या विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताला दक्षिण कोरियाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
या सामन्यात भारताकडून मनदीप आणि वरुण कुमार यांनी प्रत्येकी २ केले तर. विवेक, सुमीत, सुरेंदर, सिमरनजीत, निलकांत आणि अमित या खेळाडूंनी प्रत्येकी १ गोल करत पोलंडचा धुव्वा उडवला. आतापर्यंत या स्पर्धेत झालेल्या ५ सामन्यांमध्ये भारत अपराजित राहिला आहे.
पोलंडवर मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघाने गुणतक्त्यात १३ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यात भारताने विजयश्री मिळवली आहे. तर १ सामना बरोबरीत सोडवला आहे.