नवी दिल्ली - नेदरलँड आणि कॅनडा या दोनही देशाच्या पुरुष हॉकी संघाने आगामी टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे. जपानमध्ये होणाऱया ऑलंम्पिक स्पर्धेसाठी रंगलेल्या पात्रता फेरीत नेदरलँडने पाकिस्तानचा तर कॅनडाने आयरलँडचा पराभव करत टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेत स्थान पटकावले.
रविवारी पाकिस्तान-नेदरलँड या संघात पात्रता फेरीतील दुसरा सामना खेळला गेला. यात नेदरलँडने पाकिस्तानचा ६-१ अशा फरकाने पराभव केला. तत्पूर्वी पहिल्या पात्रता सामना उभय संघात ४-४ च्या बरोबरीत सुटला होता. मात्र, दुसरा सामना एकतर्फा जिंकत नेदरलँडने टोकियो ऑलंम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले. दरम्यान, नेदरलँडचा संघ ऑलंम्पिक स्पर्धेत १९ व्यांदा सहभागी होत आहे.