महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॉकी : भारताचा विजयी चौकार, विश्वविजेता बेल्जियमचा २-१ ने केला पराभव

बेल्जियम दौऱ्यातील चौथा सामना भारत विरुध्द यजमान बेल्जियम संघामध्ये झाला. यात भारताचा अमित रोहिदास याने पहिल्या हाफच्या १० व्याच मिनिटाला अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर यजनाम बेल्जियमकडून कर्णधार फॅलिक्स ३३ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. तेव्हा सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये सिमरनजीत सिंग याने ५२ व्या मिनिटाला गोल करत भारताला २-१ ने आघाडीवर नेले. ती आघाडी भारताने कायम ठेवत सामना जिंकला.

हॉकी : भारताचा विजयी चौकार, विश्वविजेता बेल्जियमचा २-१ ने केला पराभव

By

Published : Oct 1, 2019, 9:17 PM IST

एंटवर्प ( बेल्जिअम ) - भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम टूरमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. भारतीय संघाने विश्वविजेते आणि युरोपियन विजेते असलेल्या बेल्जियमचा २-१ ने पराभव केला. या दौऱ्यातील भारतीय संघाचा हा सलग चौथा विजय आहे.

बेल्जियम दौऱ्यातील चौथा सामना भारत विरुध्द यजमान बेल्जियम संघामध्ये झाला. यात भारताचा अमित रोहिदास याने पहिल्या हाफच्या १० व्याच मिनिटाला अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर यजनाम बेल्जियमकडून कर्णधार फॅलिक्स ३३ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. तेव्हा सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये सिमरनजीत सिंग याने ५२ व्या मिनिटाला गोल करत भारताला २-१ ने आघाडीवर नेले. ती आघाडी भारताने कायम ठेवत सामना जिंकला.

हेही वाचा -हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

दरम्यान, भारताने या मालिकेत एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. यजमान बेल्जियमसह स्पेनला भारतीय संघान धूळ चारली आहे. ही मालिका ५ सामन्यांची असून यातील चार सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर शेवटचा सामना यजमान बेल्जियम विरुध्दच गुरूवारी होणार आहे.

हेही वाचा -हॉकी : भारताकडून स्पेनचा धुव्वा, केली ६-१ ने मात

ABOUT THE AUTHOR

...view details