नवी दिल्ली - हॉकी इंडियाने (एचआय) देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची शिफारस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. हॉकी इंडियाने श्रीजेशसोबत यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार, आणि द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही आपल्या खेळांडूंच्या नावाची घोषणा केली आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाकडून गोलकीपर श्रीजेशची शिफारस - pr sreejesh
हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार, आणि द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही आपल्या खेळांडूंच्या नावाची केली घोषणा
गोलकीपर श्रीजेश
अर्जुन पुरस्कारासाठी चिंगलेनसाना सिंह, आकाशदीप सिंह आणि महिला हॉकी संघातील खेळाडू दीपिकाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मेजर ध्यानचंद पुरस्कारासाठी डॉ. आरपी सिंह आणि संदीप कौर यांचीही शिफारस करण्यात आली आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी हॉकी इंडियाकडून बलजीत सिंह, बी.एस. चौहान आणि रोमेश पाथानिया यांचे नाव क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे.