नवी दिल्ली -मिडफिल्डर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारताचा हॉकी संघ २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान बेल्जियमचा दौरा करणार आहे. त्यासाठी २० खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा -आफ्रिदीचा जावईशोध; म्हणाला म्हणून लंकेच्या खेळाडूंचा देशात खेळण्यासाठी नकार
या संघाचे उपकर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत सिंगला सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यावर बेल्जियम विरुद्ध भारतीय संघ तीन तर स्पेन विरुद्ध दोन सामने खेळणार आहे. मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघातून खेळलेल्या ललित उपाध्यायचे पुनरागमन झाले आहे.
ऑलिम्पिक टेस्ट इवेंटच्या पात्रता फेरीत न खेळलेल्या रुपिंदर पाललाही संघात स्थान देण्यात आले आहे. पीआर श्रीजेश आणि कृष्णा बी.पाठक हे दोन गोलकीपर संघात आहेत.