महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊन : हॉकी इंडियाने राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा केल्या अनिश्चित काळासाठी स्थगित

By

Published : Apr 14, 2020, 3:15 PM IST

हॉकी इंडियाने, पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर, राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. हॉकी इंडियाने या संदर्भात ट्विट केले आहे.

covid 19 hockey india postpones various national championships after lockdown extension
लॉकडाऊन : हॉकी इंडियाने राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा केल्या अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी २१ दिवसांनी वाढवला आहे. मोदींनी यांची घोषणा आज (मंगळवार) केली आणि त्यानुसार ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र, या वाढलेल्या लॉकडाऊनचा फटका 'हॉकी इंडिया'ला बसला आहे.

हॉकी इंडियाने, पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर, राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. हॉकी इंडियाने या संदर्भात ट्विट केले आहे. या स्पर्धा २९ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार होत्या. तर स्पर्धेची सांगता ३ जुलैला होणार होती. पण लॉकडाऊनमुळे आता ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे.

दरम्यान, हॉकी इंडियाने कोरोनाचे संकटातून बाहेर पडल्यानंतर नवीन तारखांची घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. जगभरासह भारतातही कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारावर गेली आहे. यात एकूण बळींची संख्या ३३९ वर पोहोचली आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा -कोरोना युद्ध : दिग्गज हॉकीपटू धनराज पिल्लेकडून 5 लाखांची मदत

हेही वाचा -भारतात परतण्यासाठी मदत करा, अमेरिकेत आजारी असलेल्या विश्वविजेत्या हॉकीपटूची विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details