महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युरो पात्रता फुटबॉल स्पर्धा : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने पोर्तुगाल विजयी - युरो चषक २०२०

युरो २०२० पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या ‘ब’ गटातील सामन्यात पोर्तुगालने लिथुआनिया संघाचा ५-१ गोल फरकाने धुव्वा उडवला. लिथुआनियामधील विलनियस शहरात झालेल्या या लढतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ४ गोल केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याची ही आठवी हॅट्ट्रिक ठरली.

युरो पात्रता फुटबॉल स्पर्धा : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने पोर्तुगाल विजयी

By

Published : Sep 12, 2019, 2:48 PM IST

पॅरिस - युरो २०२० पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या ‘ब’ गटातील सामन्यात पोर्तुगालने लिथुआनिया संघाचा ५-१ गोल फरकाने धुव्वा उडवला. लिथुआनियामधील विलनियस शहरात झालेल्या या लढतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ४ गोल केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याची ही आठवी हॅट्ट्रिक ठरली.

हेही वाचा -फुटबॉलविश्वातील 'रोनाल्डो'पर्व संपणार, दिले निवृत्तीचे संकेत

पोर्तुगालने युरो चषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. सलामीच्या लढतीत त्यांनी सर्बियाला ४-२ गोल फरकाने हरवले होते. कारकीर्दीतील १६० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या रोनाल्डोने पहिल्या हापमध्ये ७व्या , तर दुसऱ्या हाफमध्ये ६१, ६५ आणि ७६व्या मिनिटाला अनुक्रमे ४ गोल ठोकले.

हेही वाचा -रोनाल्डो म्हणतो, 'मला मेस्सीसोबत जेवण करायला आवडेल'

तर विल्यम कार्वेल्होने भरपाई वेळेत (एक्ट्रा टाईम) संघासाठी पाचवा गोल केला. तर लिथुआनियातर्फे व्यातुसास आंद्रेसेव्हिसने २८ व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. क्लब स्पर्धेसह रोनाल्डोची ही ५४ वी हॅट्ट्रिक ठरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details