महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2020, 4:58 PM IST

ETV Bharat / sports

सिक्कीमच्या स्टेडियमला मिळणार बायचुंग भूतियाचे नाव

सिक्कीम फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मेन्ला एथेंपा म्हणाले, "सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या भूतियाला ही एक भेट असेल. निवृत्त झाल्यानंतरही भूतिया हा सिक्किमच नव्हे तर भारतातील युवा फुटबॉलपटूंचा आदर्श आहे. त्याने भारतीय फुटबॉलसाठी जे काही केले ते अमूल्य आहे. परंतू त्याच्या नावावर असलेले एक स्टेडियम हे फुटबॉलपटूंसाठी छोटेसे घर असू शकते. "

the football stadium named after legendary bhaichung Bhutia will be inaugurated in sikkim
सिक्कीमच्या स्टेडियमला मिळणार बायचुंग भूतियाचे नाव

कोलकाता -भारताचा महान माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतियाचे नाव सिक्कीमच्या नामचीतील एका स्टेडियमला देण्यात येणार आहे. हे स्टेडियम भूतियाचे जन्मस्थान असलेल्या दक्षिण सिक्किमच्या टिन्किताम जिल्ह्यापासून २५ किमी अंतरावर आहे. फुटबॉलपटूच्या नावावर असलेले हे भारतातील पहिले स्टेडियम असेल.

सिक्कीम फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मेन्ला एथेंपा म्हणाले, "सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या भूतियाला ही एक भेट असेल. निवृत्त झाल्यानंतरही भूतिया हा सिक्किमच नव्हे तर भारतातील युवा फुटबॉलपटूंचा आदर्श आहे. त्याने भारतीय फुटबॉलसाठी जे काही केले ते अमूल्य आहे. परंतू त्याच्या नावावर असलेले एक स्टेडियम हे फुटबॉलपटूंसाठी छोटेसे घर असू शकते. "

१९९५ मध्ये संघात पदार्पण करणारा भूतिया २०११ मध्ये फुटबॉलमधून निवृत्त झाला. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. भूतियाला १९९८ साली अर्जुन पुरस्कार आणि २००८ मध्ये पद्मश्री मिळाला आहे.

भुतिया म्हणाला, "मला खूप सन्मानित वाटत आहे. कारण या स्टेडियममध्ये नवोदित फुटबॉलपटूंना फुटबॉल खेळण्यासाठी उच्च आणि पायाभूत सुविधा मिळतील. या स्टेडियमने माझ्यासह अनेक फुटबॉलपटू देशाला दिले आहेत. या स्टेडियममध्ये माझ्या अनेक आठवणी आहेत. "

२०१० मध्ये नामचीतील स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते थांबवण्यात आले. सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमंग यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर या स्टेडियमचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले. या स्टेडियमची आसनक्षमता १५,००० आहे. हे स्टेडियम १४ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री स्वत: या स्टेडियमच्या बांधकामावर देखरेख ठेवत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details