माद्रिद- युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये अंतिम-१६ च्या पहिल्या फेरीत अॅटलेटिको माद्रिदसमोर युव्हेंट्सचे आव्हान होते. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अॅटलेटिकोने चांगली कामगिरी करताना युव्हेंट्सला २-०, असे पराभूत केले.
CHAMPIONS LEAGUE: युव्हेंट्सचा माद्रिदकडून झालेला पराभव रोनाल्डोच्या जिव्हारी - real madrid
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अॅटलेटिकोने चांगली कामगिरी करताना युव्हेंट्सला २-०, असे पराभूत केले. रोनाल्डोने हाताची ५ बोटे दाखवत मी ५ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, अॅटलेटिको एकदाही जिंकला नाही, असे हातवारे केले.
सामन्यात युव्हेंट्सकडे चेंडूचा जास्तवेळ ताबा होता. परंतु, संघाला गोल करता आला नाही. पराभवामुळे युव्हेंट्सच्या पुढील फेरीत जाणाच्या आशा धूसर झाल्या आहेत.
यावर्षी रिअल माद्रिदला सोडून रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. रोनाल्डो युव्हेंट्सकडून खेळत असल्यामुळे युव्हेंट्सला अनेकजणांनी संभाव्य विजेते ठरवले होते. युव्हेंट्सचा पराभव झाल्यानंतर अॅटलेटिकोच्या चाहत्यांनी त्याला डिवचले. यानंतर, रोनाल्डोने हाताची ५ बोटे दाखवत मी ५ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे, अॅटलेटिको एकदाही जिंकला नाही, असे हातवारे केले.