रोम -कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. या व्हायरसचा शिरकाव क्रीडाविश्वात झाला असून त्याचा सर्वात जास्त फटका फुटबॉल क्षेत्राला बसला आहे. या दरम्यान, इटालियन फुटबॉल क्लब ए.एस.रोमाच्या खेळाडूंनी आपले मानधन रूग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -'जसं युवराज-कैफ लढले, तसचं कोरोनाशी लढायचंय'
कोरोना व्हायरसविरूद्ध झुंज देणाऱ्या लोकांसाठी रुग्णालयात तीन व्हेंटिलेटर आणि आठ नवीन बेड खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी रोमाचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि खेळाडूंनी त्यांचे एका दिवसाचे मानधन देण्याची घोषणा केली. रोम हॉस्पिटलमधील अनेक जण या आजाराविरूद्ध लढा देत आहेत. त्यामुळे रूग्णालयाला काही नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.
या सर्व खेळाडूंचे एकत्रित योगदान सुमारे दोन लाख युरो असेल. इटलीमध्ये कोरोनाव्हायरसचे चार हजारहून अधिक रुग्ण आढळून आले असून ६२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.