नवी दिल्ली - प्राणघातक कोरोना विषाणूचा क्रीडा जगावरही परिणाम झाला आहे. य़ा रोगापासून बचाव म्हणून भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, क्रीडा सेलिब्रिटी आपापल्या घरी वेळ घालवत आहेत. दरम्यान, जर्मनीची दिग्गज फुटबॉलपटू मेसुत ओझीलने रमजान महिन्यात मुस्लिमांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्मनीचा फुटबॉलपटू 16 हजार मुस्लिमांना देणार जेवण
2014 मध्ये विश्वचषक जिंकणार्या जर्मनीच्या संघाचा सदस्य असलेल्या ओझीलने तुर्कीच्या धर्मादाय संस्थेला सुमारे 75 लाख रुपयांची देणगी दिली आहे. या निधीमुळे रमजान महिन्यात 16 हजार मुस्लिमांना जेवणाची व्यवस्था केली जाईल.
2014 मध्ये विश्वचषक जिंकणार्या जर्मनीच्या संघाचा सदस्य असलेल्या ओझीलने तुर्कीच्या धर्मादाय संस्थेला सुमारे 75 लाख रुपयांची देणगी दिली आहे. या निधीमुळे रमजान महिन्यात 16 हजार मुस्लिमांना जेवणाची व्यवस्था केली जाईल. एका वृत्तानुसार या धर्मादाय संस्थेचे प्रमुख केरम किनिक यांनी ओझीलचे आभार मानले आणि त्यांना आश्वासन दिले की लवकरच खाद्यपदार्थांचे पाकिटे लोकांपर्यंत पोहचवले जातील.
फुटबॉल क्लब अर्सेनलचा स्टार खेळाडू ओझील आपल्या देणगीमुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वी त्याने एक हजार मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी गुप्तपणे पैसे दिले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे वेतन कपातीला विरोध केल्यावर ओझील वादात सापडला होता.