महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'आता घरी बसण्याची वेळ', कोरोनामुळे मेस्सी चिंताग्रस्त

चेल्सी या आघाडीच्या फुटबॉल क्लबचा खेळाडू कॅलम हडसन-ओडोईला कोरोनीची लागण झाल्यानंतर दिग्गज फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोचा संघ सहकारी डॅनियन रुगानीला कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे.

Messi 'worried' over coronavirus outbreak
'आता घरी बसण्याची वेळ', कोरोनामुळे मेस्सी चिंताग्रस्त

By

Published : Mar 15, 2020, 10:22 AM IST

नवी दिल्ली -बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे 'चिंताग्रस्त' आहे. 'आता जबाबदार राहण्याची आणि घरी बसण्याची वेळ आली आहे', असे मेस्सी म्हणाला.

हेही वाचा -आयपीएलबाबत 'दादा'चे मोठे वक्तव्य, म्हणाला...

मेस्सीने स्पॅनिश भाषेत इन्स्टाग्रामवर हा संदेश पोस्ट केला. 'प्रत्येकासाठी हे कठीण दिवस आहेत. काय घडत आहे याची आम्हाला चिंता असून आम्हाला मदत करायची आहे. हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रांमधील लढाईत अग्रभागी काम करीत आहेत, ते स्वतःला सर्वात जास्त त्रास देत आहेत. मला त्यांना माझा पाठिंबा पाठवायचा आहे. उत्तम आरोग्यला प्राथमिकता दिली पाहिजे. ही एक अपवादात्मक वेळ असून आपल्याला आरोग्य अधिकारी आणि सार्वजनिक अधिकारी यांच्या सर्व शिफारसी पाळाव्या लागतील. आपण प्रभावीपणे संघर्ष करू शकतो. हा एकमेव मार्ग आहे', असे मेस्सी म्हणाला.

चेल्सी या आघाडीच्या फुटबॉल क्लबचा खेळाडू कॅलम हडसन-ओडोईला कोरोनीची लागण झाल्यानंतर दिग्गज फुटबॉलपटू खिस्तियानो रोनाल्डोचा संघ सहकारी डॅनियन रुगानीला कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेतही याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. जगभरात कालपर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सुमारे सहा हजार लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ७६ हजार लोक यातून बरेही झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details