महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाहा व्हिडिओ..सिल्वाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर सिटीने केले ८ गोल - manchester city goals against watford

याअगोदर १९९५ मध्ये मँचेस्टर युनायटेडच्या संघाने इपस्विचचा ९-०ने धुव्वा उ़डवला होता. त्यामुळे वॉटफोर्डविरुद्ध मँचेस्टर सिटीचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे. बर्नार्डो सिल्वाने १५, ४८ आणि ६० व्या मिनिटाला गोल केले.

पाहा व्हिडिओ..सिल्वाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर सिटीने केले ८ गोल

By

Published : Sep 23, 2019, 10:47 AM IST

नवी दिल्ली -स्टार खेळाडू बर्नार्डो सिल्वाने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर मँचेस्टर सिटीने वॉटफोर्डविरुद्ध ८ गोल केले. इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत सुरु असलेल्या या साममन्यात वॉटफोर्ड संघाला मात्र एकही गोल करता आला नाही.

मँचेस्टर सिटीचा संघ

हेही वाचा -भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे कालवश

याअगोदर १९९५ मध्ये मँचेस्टर युनायटेडच्या संघाने इपस्विचचा ९-०ने धुव्वा उ़डवला होता. त्यामुळे वॉटफोर्डविरुद्ध मँचेस्टर सिटीचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे. बर्नार्डो सिल्वाने १५, ४८ आणि ६० व्या मिनिटाला गोल केले.

मँचेस्टर सिटीविरुद्ध वॉटफोर्डचा संघ एकदम कमकुवत वाटत होता. पहिल्या १८ मिनिंटांतच सिटीने पाच गोल केले. त्यामुळे या स्पर्धेत सर्वात जलद पाच गोल करण्याचा विक्रमही सिटीच्या नावावर झाला आहे. सिल्वा व्यतिरिक्त विड सिल्वा, सर्जिओ अग्वेरो, रियाद महारेझ, निकोलस ओटामेंडी आणि केविन डी ब्रून यांनी इतर गोल केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details