बार्सिलोना- जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूंपैकी एक लियोनल मेस्सीचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पेप्सी कंपनीसोबत एका जाहिरातीचे चित्रिकरण करतानाचा मेस्सीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मेस्सीच्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल दीड कोटी चाहत्यांनी लाईक केले आहे.
व्हिडिओ : एकदा पाहाच..., मेस्सीची ही अचंबित करणारी किक - फुटबॉल
मेस्सी फुटबॉलला किक मारतो आणि बाटली हवेत जाते. परंतु, बाटली हवेत फिरून आहे तशीच पुन्हा उभी राहते आणि फुटबॉलही बरोबर त्याच रिंगमधून जातो.
लियोनल मेस्सीने इंस्टाग्रामवर स्वत: एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने फुटबॉलवर एक पेप्सी कंपनीची बाटली ठेवली आहे. आणि समोर एक रिंग ठेवली आहे. मेस्सी फुटबॉलला किक मारतो आणि बाटली हवेत जाते. परंतु, बाटली हवेत फिरून आहे तशीच पुन्हा उभी राहते आणि फुटबॉलही बरोबर त्याच रिंगमधून जातो.
मेस्सी फुटबॉलच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी तर भरवतोच त्याशिवाय त्याच्या कौशल्याने सर्वांना अचंबितही करून टाकतो. यामुळे त्याचे जगभर चाहते आहेत.