महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सेरी-ए लीग : जुव्हेंटसने जिंकले सलग 9 वे विजेतेपद - 9th title of serie a league

क्लबमध्ये दुसर्‍या वर्षाच्या निमित्ताने रोनाल्डोने इन्स्टाग्राममार्फत सांगितले, "मी दुसर्‍या सलग विजेतेपदासाठी खूप खूष आहे. या महान आणि विलक्षण क्लबच्या इतिहासात माझ्या योगदानाबद्दल मला खूप आनंद झाला आहे."

juventus win 9th title of serie a league
सेरी-ए लीग : जुव्हेंटसने जिंकले सलग 9वे विजेतेपद

By

Published : Jul 27, 2020, 12:04 PM IST

नवी दिल्ली -रविवारी सेम्पडोरियाविरूद्ध झालेल्या सामन्यात 2-0 असा विजय मिळवत जुव्हेंटसने सेरी-ए लीगचे सलग 9 वे विजेतेपद जिंकले. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्या सत्रात गोल करत वैयक्तिक गोलसंख्या 31 अशी केली. तर, फेडरिको बर्नार्डेस्कीने 67 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत जुव्हेंटसचा विजय निश्चित केला.

क्लबमध्ये दुसर्‍या वर्षाच्या निमित्ताने रोनाल्डोने इन्स्टाग्राममार्फत सांगितले, "मी दुसर्‍या सलग विजेतेपदासाठी खूप खूष आहे. या महान आणि विलक्षण क्लबच्या इतिहासात माझ्या योगदानाबद्दल मला खूप आनंद झाला आहे."

जुव्हेंटसने लीगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. रोनाल्डो या लीगमध्ये गोल करणारा प्रमुख खेळाडू असला तरी, दोन सामने खेळणे अद्याप बाकी आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतर तो लाझीओ स्टार सिरो इम्मोबेलच्या (34 गोल) मागे आहे. सेरी-एच्या सार्वकालिन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूबद्दल सांगायचे झाले तर, गोन्जालो हिगुएनने सेरी-एच्या एका मोसमात 36 गोल नोंदवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details