कोल्हापूर -हिमाचल प्रदेश आणि झारखंडदरम्यान ज्युनिअर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप 2019-20 ची अंतिम फेरी खेळली जाणार आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झारखंडने गुजरातला 3-0 ने पराभूत केले. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हिमाचल प्रदेशने हरियाणाचा 1-0 ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.
Jr Girls football C'ship: विजेतेपदासाठी हिमाचल प्रदेश-झारखंड आमने सामने - Jr Girls C'ship 2019
ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (AIFF) कोल्हापूरात आयोजीत करण्यात आली आहे
विजेतेपदासाठी हिमाचल प्रदेश-झारखंड आमने सामने
ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (AIFF) कोल्हापूरात आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे फुटबॉलसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू आणि पोलो फुटबॉल मैदानावर खेळले जात आहेत. या स्पर्धेत तब्बल 27 राज्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यातून झारखंड आणि हिमाचल प्रदेश संघाना अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे.