महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळवला सलग दुसरा विजय - India'

सुमित कुमार ज्युनियरने सलग २ गोल करत भारताला मिळवून दिला विजय

भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळवला सलग दुसरा विजय

By

Published : May 11, 2019, 10:18 PM IST

पर्थ -भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ९ मे ला खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या सामन्यात भारताने ३-० ने धुव्वा उडवत एकतर्फी विजय साजरा केला. यापूर्वी या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पश्चिम ऑस्ट्रेलिया थंडरस्टिक्स विरुद्धच्या सामन्यात २-० ने विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून ड्रॅग-फ्लिकर रुपिंदरपाल सिंगने पहिला गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. यानंतर १२व्या आणि १३व्या मिनिटाला सुमित कुमार ज्युनियरने सलग २ गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाचा पुढचा सामना १३ मे ला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details