बिराटनगर (नेपाळ) - सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपात्यं सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ४-० ने धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सॅफ चषक महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची धडक
विजेतेपदासाठी भारतीय संघासमोर नेपाळच्या संघाचे आव्हान
भारतीय महिला संघा
अंतिम फेरीत भारताचा सामना हा नेपाळच्या संघासोबत होणार आहे. भारताकडून दलिमा छिब्बरने आणि मनीषाने प्रत्येकी १ गोल केला तर इंदुमतीने दोन गोल दागत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. भारताचे जोरदार आक्रमण आणि भक्कम बचावासमोर बांगलादेशच्या संघाला एकही गोल करता आला नाही.
भारतीय महिला संघाने आतापर्यत ४ वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात नेपाळवर विजय मिळवून पाचव्यांदा स्पर्धा आपल्या नावे करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.