कोल्हापूर - ज्युनिअर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप 2019-20 च्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने झारखंडवर 3-1 ने विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. उपांत्य फेरीत झारखंडने गुजरातला तर हिमाचल प्रदेशने हरियाणाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
Jr Girls football C'ship: झारखंडवर मात करत हिमाचल प्रदेशने पटकावले विजेतेपद
ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून कोल्हापुरात आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेतील सर्व सामने हे फुटबॉलसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू आणि पोलो फुटबॉल मैदानावर पार पडलेत.
कोल्हापूरच्या पोलो मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशसाठी पाचव्या मिनिटाला अंजूने पहिला गोल करत आपल्या संघाला सुरुवातीलाच १-० अशी आघाडी मिळवून दिली. यांनतर ४ मिनिटाच्या फरकाने कुवारने झारखंडसाठी गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. यांनतर हिमाचल प्रदेशसाठी किरणने ११ व्या तर मनीषाने ३३ व्या मिनीटाला गोल करत संघाला ३-१ अशी मोठी निर्णायक आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता न आल्याने हिमाचल प्रदेशने ३-१ असा विजय मिळवत ज्युनिअर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला. ही स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (AIFF) कोल्हापुरात आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेतील सर्व सामने हे फुटबॉलसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू आणि पोलो फुटबॉल मैदानावर पार पडलेत.