फ्रांस - आज फ्रांसच्या लायन ऑलिम्पिक स्टेडियमवर फिफा वुमन्स वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात हा सामना रंगणार असून तो सांयकाळी ८ वाजता सुरु होईल.
गुगलने फिफा वुमन्स वर्ल्डकपचे 'डूडल' देत केले अनोखे सेलिब्रेशन! - fifa
अमेरिका आणि नेदरलँड यांच्यात हा सामना रंगणार असून तो सांयकाळी ८ वाजता सुरु होईल.
या अंतिम सामन्याच्या निमित्ताने गुगलने एक डूडल तयार केले आहे. दोन्ही संघाना प्रोत्साहन देण्यासाठी गुगलने हे डूडल तयार करुन अनोखे सेलिब्रेशन केले आहे. या फिफा वुमन्स वर्ल्डकपची सुरुवात बरोबर एक महिन्याअगोदर म्हणजे ७ जूनला झाली होती. एकूण २४ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामधून अमेरिका आणि नेदरलँड संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत.
फ्रांस देशाने पहिल्यांदा ह्या स्पर्धेचे आयोजकत्व मिळवले आहे. त्यामुळे युरोपीय देशामध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा होत आहे. कॅनडात झालेल्या २०१५ च्या वर्ल्डकपचे विजेतेपद अमेरिकेने जिंकले होते. आणि आता परत एकदा अमेरिकेने विजेतेपदाकडे पाऊल टाकले आहे.