नवी दिल्ली -जागतिक फुटबॉल संस्था फिफाचे अध्यक्ष गियानि इन्फॅंटिनो यांना कोरोनाची लागण झाली आहे. फिफाने मंगळवारी ही माहिती दिली. इन्फॅंटिनो यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली आहेत. यानंतर ते विलगीकरणात आहेत.
५० वर्षीय गियानि इन्फॅंटिनो यांच्या संपर्कात आलेल्यांना दक्षता बाळगण्यास फिफाने सांगितले आहे. एका दिवसापूर्वी, ब्राझीलचा दिग्गज माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोनाल्डिन्हो सध्या बेलो होरिझोन्टेमध्ये विलगीकरणात आहे.