मुंबई- जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या हॉटेल्सचे रुपांतर रुग्णालयात करणार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. तेव्हा रोनाल्डोच्या समाजसेवेचे कौतूक जगभरातून होऊ लागले. फुटबॉल सामन्यांचे वार्तांकन करणाऱ्या जगभरातील अनेक संकेतस्थळांनी यासंदर्भातलं वृत्त दिले होते. स्पॅनिश वृत्तपत्र मार्सामध्येही याबद्दलची माहिती होती. पण आता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.
रोनाल्डोची PESTANA CR७ नावाने पोर्तुगालमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. यातील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याने सांगितलं की, 'आम्ही हॉटेल चालवतो आहे. त्याचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी रोजच्यासारखाच आहे आणि हे हॉटेलच राहणार आहे.'
या संदर्भात आम्हाला अनेक मीडिया प्रतिनिधींचे फोन आले असल्याचेही त्या कर्मचाऱ्याने सांगितलं.
काय आहे प्रकरण -