माद्रिद - अॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक दियागो सिमीयानो यांनी युव्हेंट्सविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह सेलिब्रेशनसाठी माफी मागितली आहे. युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या पहिल्या फेरीतील सामन्यात दिएगो सिमीयानो यांनी संघाने पहिला गोल केल्यानंतर आक्षेपार्ह सेलिब्रेशन केले होते.
युव्हेंट्सविरुद्धच्या 'त्या' सेलिब्रेशनसाठी अॅटलेटिको माद्रिदच्या प्रशिक्षकाने मागितली माफी
युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या पहिल्या फेरीतील सामन्यात दिएगो सिमीयानो यांनी संघाने पहिला गोल केल्यानंतर आक्षेपार्ह सेलिब्रेशन केले होते.
सामन्यातील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अॅटलेटिकोकडून ७८ व्या मिनिटाला जोस गिमिनेझ याने पहिला गोल केला होता. यानंतर, दियागो सिमीयानो यांनी प्रेक्षकांकडे बघून आक्षेपार्ह सेलिब्रेशन केले होते. याबद्दल माफी मागताना सिमीयानो म्हणाले, मी आणखिन एकदा माफी मागतो. सामन्यानंतरही मी माफी मागितली होती. हे फक्त भावनेच्या भरात केलेले वाईट सेलिब्रेशन होते.
अॅटलेटिकोकडून युव्हेंट्सने २-० असा सामना हरल्यानंतर रोनाल्डोने हाताची ५ बोटे दाखवत मी ५ वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. अॅटलेटिकोने एकदापण नाही. याबद्दल विचारले असता, दियागो सिमीयानो म्हणाले, मला हे सर्वकाही समजते. मीही याचा आधी भाग होतो. मी समजू शकतो की सर्वकाही होवू शकते.