महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवला ७५०वा गोल - ख्रिस्तियानो रोनाल्डो ७५०वा गोल

बुधवारी रात्री एलियांज स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फेडरिको चिआने जुव्हेंटसकडून पहिला गोल केला. त्यानंतर रोनाल्डो आणि मोराटाने गोल केले. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये या विक्रमाबद्दल लिहिले आहे. ''७५० गोल, ७५० आनंददायक क्षण, चाहत्यांच्या चेहऱ्यावर ७५० वेळा हसू. मला इथेपर्यंत घेऊन येणाऱ्यांचे आभार. माझ्या सर्व विरोधकांचे आभार ज्यांनी मला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरणा दिली. आता लक्ष्य ८०० गोलचे."

cristiano ronaldo scored his career's 750th goal
ख्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवला ७५०वा गोल

By

Published : Dec 4, 2020, 12:53 PM IST

तूरिन -स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने डायनामो कीव संघाविरुद्ध गोल करत विक्रम नोंदवला. चॅम्पियन्स लीगमध्ये रंगलेल्या सामन्यात जुव्हेंटसकडून खेळताना रोनाल्डोने कारकीर्दीतील ७५०वा गोल आपल्या नावावर केला. या सामन्यात जुव्हेंटसने डायनामो कीवचा ३-० असा पराभव केला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे ट्विट

हेही वाचा -आगामी आयपीएलमध्ये खेळणार दोन नवीन संघ?

बुधवारी रात्री एलियांज स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फेडरिको चिआने जुव्हेंटसकडून पहिला गोल केला. त्यानंतर रोनाल्डो आणि मोराटाने गोल केले. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये या विक्रमाबद्दल लिहिले आहे. ''७५० गोल, ७५० आनंददायक क्षण, चाहत्यांच्या चेहऱ्यावर ७५० वेळा हसू. मला इथेपर्यंत घेऊन येणाऱ्यांचे आभार. माझ्या सर्व विरोधकांचे आभार ज्यांनी मला कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरणा दिली. आता लक्ष्य ८०० गोलचे."

जुव्हेंटसकडून ७५ गोल -

३५ वर्षीय रोनाल्डोने स्पॅनिश क्लब रियल माद्रिदकडून ४५०, इंग्लंडचा फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडसाठी ११८, आपल्या देश पोर्तुगालसाठी १०२ आणि जुव्हेंटससाठी ७५ गोल आणि स्पोर्टिंगसाठी ५ गोल केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details