महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा सर्वश्रेष्ठ - serie a 2021 news

रोनाल्डोने जुवेंटस एफसी क्लबकडून सिरी ए लीग स्पर्धेत खेळताना ३१ गोल केले. या कामगिरीमुळे त्याचा सिरी ए लीगचा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.

Cristiano Ronaldo named Serie A player of the year again
ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा सर्वश्रेष्ठ

By

Published : Mar 20, 2021, 5:10 PM IST

मिलान -ख्रिस्तियानो रोनाल्डो सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला आहे. त्याने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हा पुरस्कार देण्यात आलेला नव्हता.

रोनाल्डो सिरी ए लीगच्या मागील हंगामात जुवेंटस एफसी क्लबकडून ३३ सामने खेळला. यात त्याच्या नावे ३१ गोल आहेत. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर जुवेंटस एफसीने विजेतेपद पटकावले. जुवेंटस एफसीचे हे सलग नववे विजेतेपद आहे.

पुरस्कार जिंकल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, 'सुरूवातीला विनाप्रेक्षक सामने खेळणे कठिण ठरले. पण आम्ही विजयाचे ध्येय ठेवले आणि यात आम्हाला यश मिळाले. आत्मविश्वास, खेळाप्रति असलेली भावना आणि अनुशासन याच्या जोरावर मी या वयात देखील चांगली कामगिरी करत आहे.'

हेही वाचा -भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण

हेही वाचा -ISL-७ : एटीके मोहन बागानचा पराभव करत मुंबई सिटी एफसीने पटकावले जेतेपद

ABOUT THE AUTHOR

...view details