महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ख्रिस्तियानो रोनाल्डोने झळकावला ७०० वा ऐतिहासिक गोल, तरीही.......

युक्रेनविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हा ऐतिहासिक गोल झळकावला असला तरी, ब गटातील या सामन्यात पोर्तुगाल संघाला १-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे युरो २०२० स्पर्धेत युक्रेनच्या संघाने आपले स्थान पक्के केले. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील ७२ व्या मिनिटाला रोनाल्डोने हा गोल केला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने झळकावला ७०० वा ऐतिहासिक गोल, तरीही.......

By

Published : Oct 15, 2019, 6:12 PM IST

नवी दिल्ली -पोर्तुगाल संघाचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेने युक्रेनविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. युएएफए युरो पात्रता स्पर्धेत (UEFA Euro Qualifier) रोनाल्डोने कारकिर्दीतला ७०० वा गोल नोंदवला.

हेही वाचा -आयसीसीने वाढवली महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम, मिळणार इतके कोटी

युक्रेनविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हा ऐतिहासिक गोल झळकावला असला तरी, ब गटातील या सामन्यात पोर्तुगाल संघाला १-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे युरो २०२० स्पर्धेत युक्रेनच्या संघाने आपले स्थान पक्के केले. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील ७२ व्या मिनिटाला रोनाल्डोने हा गोल केला आहे.

या ७०० गोलपैकी रोनाल्डोने ४५० गोल हे रियाल माद्रिदसाठी, मँचेस्टर युनायटेडसाठी ११८, स्पोर्टिंग ७ आणि युव्हेंटस क्लबसाठी ३२ गोल केले आहेत. तर, पोर्तुगाल संघासाठी त्याने ९५ गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोने सहावे स्थान काबीज केले आहे. पेले (७६७), जोसेफ बिसॅन (८०५), रोमारिओ (७७२), फेरेंस पुस्कास (७४६) आणि गेर्ड म्युलर (७३५) हे दिग्गज खेळाडू रोनाल्डोच्या पुढे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details