हैदराबाद - इंडियन सुपर लीग (आयएसएल) ची सुरूवात पुढील महिन्यात गोवामध्ये होणार आहे. पण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच सात खेळाडूंसह एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसएल स्पर्धेसाठी गोवामध्ये दाखल झालेल्या सर्व संघातील खेळाडू आणि स्टाप सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात सात खेळाडूंसह एक सहाय्यक प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती.
कोणत्या संघातील खेळाडूंना लागण झाली आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इतर खेळाडूंना व स्टाप सदस्यांना बायो बबलमध्ये पाठवण्यात आलं आहे. याशिवाय जे बाधित झाले आहेत त्यांना वेगळे क्वारंटाइन करण्यात आले आहे.